“आज महाराज असते तर…”, टिपू सुलतान प्रकरणावर मराठी अभिनेत्याची प्रतिक्रिया; म्हणाला…
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्यामुळे राज्यात राजकीय वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या नेत्यांनी या विधानाचा निषेध केला आहे. मराठी अभिनेता अभिजीत केळकरनेही या प्रकरणावर प्रतिक्रिया देत इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. मालेगावातील महापौरांनी त्यांच्या कक्षात टिपू सुलतानचा फोटो लावल्याने हा वाद सुरू झाला होता.