“रुपाली चाकणकरांची भूमिका करु नका सांगत राजकीय दबाव”; दीपाली सय्यद यांचा दावा काय?
नाशिकमधील अशोक खरातच्या लैंगिक शोषण प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला कठोर शिक्षा होईल असे सांगितले. या प्रकरणावर आधारित 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटात दीपाली सय्यद रुपाली चाकणकरांची भूमिका साकारणार आहेत. मात्र, त्यांना राजकीय दबावाचा सामना करावा लागत आहे. दीपाली यांनी या दबावाला न घाबरता आपले काम सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.