“माझं गोत्र विचारलं अन्…”, अभिनेत्रीने सांगितला अस्वस्थ करणारा अनुभव
दाक्षिणात्य अभिनेत्री ऐश्वर्या लक्ष्मीने तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ईरोडमधील एका गावात आलेला अस्वस्थ करणारा अनुभव शेअर केला आहे. तिथल्या लोकांनी तिला तिचं गोत्र आणि जात विचारली, ज्यामुळे ती अस्वस्थ झाली. ऐश्वर्याने सांगितलं की, तिला तिचं गोत्र माहीत नाही आणि मल्याळी लोकांचा अभिमान वाटला कारण तिला कधीच असा प्रश्न विचारला नव्हता. ती म्हणाली की, सर्व लोक असे नसले तरी हा अनुभव तिला आला.