हनुमान मंदिरातील डीजेचा त्रास, अभिनेत्याची थेट पोलिसांत तक्रार; ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं
दाक्षिणात्य अभिनेता अल्लू शिरीषने हैदराबादमधील शेखपेट भागातील हनुमान मंदिरात रात्री उशिरापर्यंत वाजणाऱ्या मोठ्या आवाजातील गाण्यांमुळे त्रस्त होऊन पोलिसांत तक्रार केली. त्याने सोशल मीडियावरून हैदराबाद पोलिसांचे लक्ष वेधले. यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केले. शिरीषने स्पष्टीकरण देत आपण हनुमान भक्त असल्याचे सांगितले आणि तक्रार सिव्हिक सेन्सबद्दल असल्याचे स्पष्ट केले.