स्वतःला ‘कुरूप’ म्हणून फॅशनविश्व गाजवणाऱ्या भारताच्या पहिल्या ‘सुपरमॉडेल’ची गोष्ट!
अंजली फिलीस मेंडिस, सावळ्या रंगामुळे आणि जास्त उंचीमुळे भारतात नाकारली गेली होती. मात्र, पॅरिसच्या फॅशन जगतात तिने भारताचा झेंडा फडकवला. १९४६ साली जन्मलेल्या अंजलीने सेक्रेटरी म्हणून करिअरची सुरुवात केली. पियरे कार्डिन यांच्या समोर साडी, टिकली आणि अंबाडा घालून चालून दाखवल्यानंतर तिला 'हाऊस मॉडेल' म्हणून काम मिळाले. पुढे ती पॅरिसमधील प्रसिद्ध भारतीय मॉडेल बनली. २०१० मध्ये तिचे निधन झाले.