MMS लीक झाल्याने करिअर संपलं; गुपचूप लग्न केलं, अभिनेत्री ३५ व्या वर्षी होणार आई
भोजपुरी अभिनेत्री प्रियंका पंडित तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. एमएमएस लीक विवादामुळे करिअर उद्ध्वस्त झाल्यानंतर तिने अभिनय सोडून वृंदावनात अध्यात्माचा मार्ग निवडला. तिने प्रेमानंद महाराजांच्या सेवकाशी गुपचूप विवाह केला आणि आता ती आई होणार आहे. प्रियंकाने इन्स्टाग्रामवर गरोदर महिलांची काळजी घेण्याबाबत भावुक पोस्ट शेअर केली. एमएमएस विवादानंतर तिला काम मिळणं बंद झालं आणि ती कृष्णभक्तीत लीन झाली.