“मी लहान मुलीशी लग्न केलंय,” १२ वर्षांनी लहान बायकोबद्दल अभिनेत्याचं वक्तव्य
दाक्षिणात्य सुपरस्टार फहाद फाझिल आणि त्याची पत्नी नझरिया नझीम यांच्या विभक्त होण्याच्या चर्चांना फहादने एका कार्यक्रमात उत्तर दिलं. त्याने नझरियाचं कौतुक करत तिला लहान मुलगी म्हटलं. नझरियाला सांभाळल्यामुळे लहान मुलांना हाताळण्याचा अनुभव मिळाल्याचं तो म्हणाला. फहादने 'डोंट ट्रबल द ट्रबल' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान हे वक्तव्य केलं. फहाद आणि नझरियाने २०१४ साली लग्न केलं होतं.