१० लाखांची ओपनिंग ते २२व्या दिवशी ६.५ कोटींचा गल्ला! ‘या’ भारतीय चित्रपटाचा जलवा
'हनुमान अंश' चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर चमत्कार घडवला आहे. ७ ऑगस्ट रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी १० लाखांची ओपनिंग केली होती, परंतु आता त्याची कमाई कोटींमध्ये पोहोचली आहे. रक्षाबंधनच्या दिवशी ६ कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटाने २२व्या दिवशी ६.५० कोटी रुपये कमावले. 'बटवारा १९४७' आणि 'आवारापन २' सारख्या मोठ्या चित्रपटांच्या स्पर्धेतही 'हनुमान अंश' टिकून आहे. प्रेक्षकांच्या मागणीमुळे शोजची संख्या वाढवण्यात आली आहे.