बॉक्स ऑफिस गाजवणारा ‘हनुमान अंश’ जगभरात रिलीज होणार, तारीख आली समोर
गेल्या काही दिवसांपासून 'हनुमान अंश' हा नीम करोली बाबांवरील चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर गाजतोय. स्टीव्ह जॉब्स, मार्क झुकरबर्ग आणि ज्युलिया रॉबर्ट्स यांसारख्या दिग्गजांना प्रेरणा देणाऱ्या बाबांची कथा आता जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. ११ सप्टेंबर २०२६ रोजी हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित होणार आहे. २६व्या दिवसापर्यंत चित्रपटाने ६३.८२ कोटी रुपयांची कमाई केली आहे.