“अभिनेत्यांच्या ३-३ बायका, म्हणून कोणी मुलगी…”; ज्योतिकाच्या सासऱ्यांचा मोठा खुलासा
आताच्या पिढीला शिवकुमार हे अभिनेता सूर्या व कार्तीचे वडील म्हणून माहीत असतील, पण आधीच्या पिढ्यांसाठी ते उत्कृष्ट अभिनेते होते. शिवकुमार यांचे चित्रकार होण्याचे स्वप्न होते, पण मॉडर्न आर्टमुळे त्यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी अभिनयात प्रवेश केला. चित्रपटसृष्टीत आल्यावर लग्नासाठी अडचणी आल्या, पण शेवटी लक्ष्मी कुमारीशी विवाह केला. त्यांना सूर्या, कार्ती आणि वृंदा ही मुलं आहेत.