४० व्या वर्षी आई झाली अभिनेत्री! ६ वर्षांपासून आहे रिलेशनशिपमध्ये
जगप्रसिद्ध पॉप स्टार लेडी गागा आणि तिचा होणारा पती मायकल पोलान्स्की यांच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. ४० वर्षांची लेडी गागा आई झाली असून तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. उत्तर कॅलिफोर्नियामध्ये ते नवजात बाळाबरोबर साध्या लूकमध्ये फिरताना दिसले. लेडी गागाने तिच्या 'मेहेम बॉल' वर्ल्ड टूरनंतर आई होण्याची इच्छा व्यक्त केली होती. सध्या ती मायकल व बाळाबरोबर शांत आयुष्य जगतेय.