“माझ्या हिंदू वडिलांनी इस्लाम स्वीकारला”; मंदिरात गेल्याने ट्रोल झाल्यावर अभिनेत्री रडली
दाक्षिणात्य अभिनेत्री फारिया अब्दुल्ला 'बोनालू' उत्सवात पारंपरिक वेशभूषेत डान्स आणि पूजा करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ट्रोल झाली. मुस्लीम असून हिंदू सणात भाग घेतल्यामुळे तिला 'काफिर' म्हटलं गेलं. इन्स्टाग्रामवर भावुक व्हिडीओ शेअर करत तिने वडिलांच्या धर्मांतराचा खुलासा केला. विविध संस्कृती जवळून पाहिल्यामुळे तिचा दृष्टिकोन व्यापक असल्याचं सांगत, सर्वांचं चांगलं होवो अशी इच्छा व्यक्त केली.