२२ वर्षांच्या विवाहित अभिनेत्रीने दत्तक घेतलं दुसरं बाळ! मुलाच्या आगमनाबद्दल दिली माहिती
जागतिक स्तरावरील लोकप्रिय अभिनेत्री मिली बॉबी ब्राऊन आणि तिचा पती जेक बाँजिओव्ही यांनी दुसऱ्या बाळाचं स्वागत केलं आहे. त्यांनी एका गोंडस मुलाला दत्तक घेतलं आहे. मिलीने २०२५ मध्ये एका मुलीला दत्तक घेतल्यानंतर आता एका मुलाला दत्तक घेऊन आपले स्वप्न पूर्ण केले आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर नवजात बाळाचा फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली.