वीरेंद्र सहवागने ‘हा’ सिनेमा पाहिल्यावर भारावलेला दिग्दर्शक म्हणाला, “विराट-अनुष्कानेही..”
माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने नीम करोली बाबा यांच्या जीवनावर आधारित 'हनुमान अंश' या चित्रपटाचे कौतुक केले आहे. आपल्या इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत सेहवागने प्रेक्षकांना हा चित्रपट थिएटर्समध्ये पाहण्याचे आवाहन केले. चित्रपटातील भावुक प्रसंगांनी त्याचे मन जिंकले. दिग्दर्शक विशाल चतुर्वेदी यांनी चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केले असून, ११ सप्टेंबरला हा चित्रपट जगभरात रिलीज होणार आहे.