“लॉरेन्स बिष्णोईला बोलवू का?” सलमान खानच्या शूटिंगमध्ये घुसून अज्ञाताची धमकी!
गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवुड अभिनेता सलमान खानला लॉरेन्स बिष्णोई गँगकडून धमक्या येत आहेत. बुधवारी दादरमध्ये शूटिंगदरम्यान एका अज्ञात व्यक्तीने सेटवर घुसून 'बिष्णोई को बुलाऊं क्या?' अशी धमकी दिली. पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. बिष्णोई गँगने सलमानला काळवीट शिकार प्रकरणापासून लक्ष्य केलं आहे. यापूर्वीही सलमानच्या बंगल्यावर गोळीबार झाला होता.