एक-दोन हजार नव्हे तर ‘टायटॅनिक’ फेम अभिनेत्याने वेटरला दिली तब्बल ५५ लाखांची टीप
हॉलिवूड अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रिओ सध्या चर्चेत आहे, मात्र त्याच्या चित्रपटांमुळे नव्हे तर एका उदार कृतीमुळे. फ्रान्समधील सेंट-ट्रोपेझ येथे डिनर केल्यानंतर त्याने वेटरला ५० हजार युरो (सुमारे ५५ लाख रुपये) टीप दिली. साध्या पांढऱ्या कार्डाने बिल भरून त्याने सर्वांचे लक्ष वेधले. या कृतीमुळे वेटर एका रात्रीत लखपती झाला.