“माझी जिवलग मैत्रीण, माझी आवडती व्यक्ती”, माधुरी दीक्षितसाठी श्रीराम नेने यांची खास पोस्ट
माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांच्या लग्नाच्या २७व्या वाढदिवसानिमित्त श्रीराम नेने यांनी त्यांच्या लग्नातील फोटोंचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर मोठी कॅप्शन देत त्यांच्या प्रेमकहाणीच्या आठवणी सांगितल्या. त्यांनी लग्नाआधी फक्त तीन महिने डेट केलं होतं. सध्या माधुरी 'कोण होणार करोडपती' शोचं सूत्रसंचालन करत असून, प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.