“माझी भूमिका…”, स्वत:च्या बायोपिकविषयी अजित पवारांनी व्यक्त केलेली ‘ही’ इच्छा
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने राज्याला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक जुने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 'चला हवा येऊ द्या'मधील अभिषेक बारहाते-पाटील यांनी अजित पवारांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अजित पवार यांनी त्यांच्या बायोपिकमध्ये डॉ. निलेश साबळे यांनी भूमिका साकारावी असे म्हटले होते. निलेश साबळे यांनीही त्यांच्या मिमिक्रीबद्दल प्रतिक्रिया दिली.