गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी अभिनेत्याने घेतलं तिसरं घर; म्हणाला, “आजच्या दिवशी…”
मराठी अभिनेता अंशुमन विचारेने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मुंबईत तिसरे नवीन घर खरेदी केले आहे. त्याने सोशल मीडियावर पत्नीबरोबरचे फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला. चाहत्यांनी आणि कलाकारांनी त्याला शुभेच्छा दिल्या. अंशुमनने 'फु बाई फु', 'कॉमेडीची बुलेट ट्रेन', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' यांसारख्या शोमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्याने 'संघर्ष', 'पोश्टर बॉईज' यांसारख्या सिनेमांमध्येही काम केले आहे.