“वडील गेल्यानंतर…”, विजय गोखलेंनी सांगितली बाळासाहेब ठाकरेंची जुनी आठवण; म्हणाले…
ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी संबंधित एक आठवण शेअर केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे मराठी कलाकारांशी विशेष नाते होते. विजय गोखले यांच्या वडिलांमुळे त्यांचा बाळासाहेबांशी संबंध आला होता. बाळासाहेबांनी त्यांच्या नाट्यमहोत्सवाला आर्थिक आणि मानसिक सहकार्य केले होते. विजय यांनी संघटनेसाठी काम करण्याची इच्छा व्यक्त केली असता, बाळासाहेबांनी त्यांना त्यांच्या क्षेत्रातच राहण्याचा सल्ला दिला.