विजय कदम यांच्या निधनावर प्रशांत दामलेंची भावुक प्रतिक्रिया, म्हणाले, “परवापर्यंत आम्ही…”
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज पहाटे अंधेरी येथील निवासस्थानी निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा आहेत. ओशिवरा येथे आज दुपारी अंत्यसंस्कार होणार आहेत. विजय कदम कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. अभिनेते प्रशांत दामलेंनी विजय चव्हाणांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.