‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित, नेटकरी म्हणाले, “जबरदस्त”
'नवरा माझा नवसाचा २' हा मराठी चित्रपट सध्या चर्चेत आहे. २००४ साली प्रदर्शित झालेल्या पहिल्या भागानंतर प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे. आज १५ ऑगस्टला चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर यांसारखे दिग्गज कलाकार आहेत. २० सप्टेंबरला 'नवरा माझा नवसाचा २' चित्रपट प्रदर्शित होणार आहे.