सईला आवडला ‘बिग बॉस मराठी’तील ‘या’ सदस्याचा स्वभाव, निक्की तांबोळीचा उल्लेख करत म्हणाली…
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात आता फक्त घरात नऊ सदस्य बाकी राहिले आहेत. पण जसे जसे सदस्य कमी होतायत तशी घरातील समीकरणं बदलताना दिसत आहेत. वर्षा उसगांवकर आता अरबाज, निक्कीबरोबर खेळताना दिसत आहेत. तसंच नुकत्याच झालेल्या कॅप्टन्सी टास्कमध्ये ‘बी टीम’मध्ये खेळत असूनही संग्राम व जान्हवीने अरबाजबरोबर केलेली डील चांगलीच महागात पडली. कॅप्टन्सी टास्कमधून संपूर्ण ‘बी टीम’ बाद झाली. ‘बिग बॉस घरात’ असं सर्व चित्र असताना सई ताम्हणकरने या लोकप्रिय शोविषयी भाष्य केलं आहे.