भारतमातेची माफी मागत सिद्धार्थने कोलकाता बलात्कार प्रकरणावर मांडली संतप्त भावना, म्हणाला..
कोलकाता येथील आर. जी. आर वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी देशभरात खळबळ उडाली आहे. नागरिक रस्त्यावर उतरले असून सोशल मीडियावर संताप व्यक्त होत आहे. अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देत व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने मुलींच्या सुरक्षिततेवर आणि मुलांच्या संस्कारांवर विचार मांडले आहेत.