“२४ तास हायवे बंद; पण कुणालाच काळजी नाही”, मुंबई-पुणे वाहतूक कोंडीवर मराठी गायकाचा संताप
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक ३२ तासांनंतर पूर्ववत झाली. आडोशी बोगद्याजवळ प्रोपलीन गॅस टँकर उलटल्याने वाहतूक ठप्प झाली होती. मराठी गायक मंगेश बोरगावकरने सोशल मीडियावर या कोंडीवर संताप व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले असून, राज ठाकरे यांनी प्रवाशांचा टोल परत करण्याची मागणी केली आहे.