मायकल जॅक्सनच्या जीवनावर आधारित चित्रपटाने ५ दिवसांत कमावले तब्बल २००० कोटी
मायकल जॅक्सनच्या जीवनावर आधारित 'मायकल' या बायोपिकने पाच दिवसांत २००० कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट २२ एप्रिलला यूकेमध्ये आणि २४ एप्रिलला भारतात प्रदर्शित झाला. मायकलची भूमिका त्याचा पुतण्या जाफर जॅक्सनने साकारली आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. दिग्दर्शन आंत्वां फुक्वा यांनी केले असून, निर्मिती जॅक्सन कुटुंबीयांनी केली आहे.