ज्येष्ठ अभिनेत्याने मुलगा अन् सूनेविरोधात दिली तक्रार; त्यानेही वडिलांवर केले आरोप
ज्येष्ठ तेलुगू अभिनेते मोहन बाबू आणि त्यांचा मुलगा मंचू मनोज यांनी एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. मोहन बाबू यांनी मनोज आणि सून मोनिका यांच्यावर धमकी दिल्याचा आरोप केला आहे आणि पोलिसांकडून सुरक्षा मागितली आहे. दुसरीकडे, मनोजने वडिलांनी हल्ला केल्याचा दावा केला आहे. दोघांनीही पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे.