Nana Patekar Life Story: नाना पाटेकर: ‘गरिबी’ जगलेला, ‘समृद्ध’ अभिनेता!
अभिनेता नाना पाटेकर यांच्या अभिनयामागे त्यांच्या संघर्षाने भरलेल्या आयुष्याचा मोठा वाटा होता. बालपणीची गरिबी, वडिलांचा बंद पडलेला व्यवसाय, तेराव्या वर्षी चित्रपटाचे पोस्टर रंगवण्याचे काम, न्यूनगंड आणि पहिल्या मुलाचे निधन अशा अनेक प्रसंगांनी त्यांना घडवले. ‘क्रांतिवीर’मधील न लिहिलेला क्लायमॅक्स असो वा गरिबांच्या मदतीसाठी गाडी खरेदी रद्द करण्याचा निर्णय, नानांचे आयुष्य एका खऱ्या नटसम्राटासारखेच होते.