एकेकाळी होती सर्वात लोकप्रिय बालकलाकार; अभिनय सोडून आता करतेय ‘हे’ काम
१९९० साली 'अंजली' चित्रपटात बेबी शामलीने मानसिकदृष्ट्या विशेष मुलीची भूमिका साकारून सर्वांचे मन जिंकले. तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. शामलीने तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केले. नायिका म्हणून तिने 'ओये' चित्रपटातून पदार्पण केले, पण यश मिळाले नाही. २०१८ पासून तिने व्हिज्युअल कम्युनिकेशन आणि फिल्म स्टडीजमध्ये शिक्षण घेतले. २०२३ मध्ये तिने चेन्नई, दुबई आणि बेंगळुरू येथे कला प्रदर्शन भरवली.