मराठी अभिनेत्याचं आलिया भट्टने केलं कौतुक, समय रैनाही निशब्द; व्हिडीओ व्हायरल
समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटंट' शोच्या दुसऱ्या सिझनच्या पहिल्या भागात मराठी अभिनेता सुकृत देवने आपल्या अभिनयाने सर्वांना प्रभावित केले. अंबरनाथचा हा मराठी मुलगा दारुड्या माणसाची भूमिका इतकी उत्तम वठवली की आलिया भट्ट, शर्वरी वाघ आणि समय रैना यांनी त्याला १० पैकी १० मार्क्स दिले. सुकृतने स्वतःला ८ मार्क्स दिल्यामुळे तो जिंकू शकला नाही, पण त्याने सर्वांची मने जिंकली. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.