२७० कोटींमध्ये बनलेल्या ‘या’ चित्रपटाने कमावलेले तब्बल ७०० कोटी, ओटीटीवर आहे ट्रेंडिंग
प्रभासच्या 'सालार' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी ओटीटीवर प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. २०२३ मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट जिओ हॉटस्टारवर तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये उपलब्ध आहे आणि ३६६ दिवसांपासून ट्रेंडिंगमध्ये आहे. २७० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने ७०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. प्रभासने प्रेक्षकांचे आभार मानले असून, या चित्रपटाचा दुसरा भाग २०२६ मध्ये येणार आहे.