५० दिवसांनंतर ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपट आता घरबसल्या पाहता येणार
५० दिवसांनंतर आता ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. यासंदर्भात सचिन पिळगांवकर यांनी नुकतीच पोस्ट केली आहे. “आता ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपट ‘अमेझॉन प्राईम’वर प्रदर्शित झाला असून चित्रपटगृहात देखील सुरू आहे”, असं सचिन पिळगांवकरांनी त्यांच्या पोस्टमधून सांगितलं आहे.