पोलिसांनी अल्लू अर्जुनला नेलं वैद्यकीय तपासणीसाठी, रुग्णालयातील व्हिडीओ आला समोर
तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनला हैदराबाद येथील घरातून पोलिसांनी अटक केली. 'पुष्पा 2' चित्रपटाच्या प्रिमियरमध्ये चेंगराचेंगरी होऊन एका ३९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी अर्जुनला अटक करून वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेलं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अर्जुनच्या अटकेनंतर अनेक चाहते त्याच्या समर्थनार्थ पोस्ट करत आहेत. आज त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.