Pushpa 2: पहिल्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवशी कमाईत घट, ‘पुष्पा 2’चे कलेक्शन किती?
'पुष्पा 2: द रुल' हा बहुप्रतिक्षित चित्रपट ५ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळवला आहे. पहिल्या दिवशी १७५.१ कोटी आणि दुसऱ्या दिवशी ९०.१ कोटी रुपयांची कमाई केली. दोन दिवसांत एकूण २७५ कोटी रुपये भारतात आणि जगभरात ४०० कोटींहून अधिक कमाई झाली आहे.