Pushpa 2 चा बॉक्स ऑफिसवर जलवा, ठरला यंदाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट
'पुष्पा 2: द रूल' चित्रपटाने आठवडाभरात बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाच्या या चित्रपटाने आठव्या दिवशी ३७.४० कोटी रुपयांची कमाई केली आहे. एकूण कमाई ७२५.७५ कोटी रुपये झाली आहे. 'पुष्पा 2' ने 'बाहुबली 2' ला मागे टाकत सर्वात जलद १००० कोटी कमावणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. सुकुमार दिग्दर्शित हा चित्रपट 'पुष्पा: द राइज'चा सिक्वेल आहे.