“…म्हणून मराठी चित्रपट चालत नाहीत”, राज ठाकरेंनी व्यक्त केलं रोखठोक मत; म्हणाले…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांच्या युट्यूब चॅनेलसाठी दिलेल्या मुलाखतीत मराठी चित्रपटांबद्दल चिंता व्यक्त केली. मराठी चित्रपटांना सिनेमाघर मिळत नसल्याबद्दल त्यांनी मनसेच्या आंदोलनाचा उल्लेख केला. मराठी चित्रपटांनी प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी चित्रपटाच्या कथानकात बदल करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.