“नातं पुढे जाऊ शकलं नाही”, त्रिशा कृष्णनबरोबरच्या डेटिंगवर राणा दग्गुबातीने केलेलं भाष्य
राणा दग्गुबाती आणि त्रिशा कृष्णन यांची अनेक वर्षांपासून मैत्री आहे. 'कॉफी विथ करण सीझन ६'मध्ये राणाने दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचं मान्य केलं. मात्र, त्यांचं नातं पुढे जाऊ शकलं नाही. नातं संपल्यानंतरही त्यांची मैत्री कायम राहिली. राणाने २०२० मध्ये मिहिका बजाजबरोबर लग्न केलं, तर त्रिशाने तिच्या अभिनय कारकिर्दीवर लक्ष केंद्रित केलं आहे.