सोने तस्करी प्रकरणी अटकेत असलेल्या रान्या रावला जामीन मंजूर; पण अभिनेत्रीची सुटका नाहीच
कन्नड अभिनेत्री रान्या रावला ४ मार्च रोजी बंगळुरू विमानतळावर १४.८ किलो सोन्याची तस्करी केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. मंगळवारी (२० मे) तिला सशर्त जामीन मंजूर झाला. न्यायालयाने जामीन मंजूर करताना काही अटी घातल्या आहेत. यानुसार तिला कोठडीतच राहावे लागेल. यामुळे या प्रकरणी रान्याच्या आईने कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली असून, याबद्दलची सुनावणी येत्या ३ जून रोजी होणार आहे.