विजय देवरकोंडा-रश्मिका मंदानाने ‘त्या’ चिमुकल्या चाहतीला घरी बोलावून केला खास पाहुणचार
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाच्या उदयपूरमधील शाही विवाहसोहळ्यानंतर, एका चिमुकल्या चाहतीने "मला लग्नाला का बोलावले नाही?" असा व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर विजय आणि रश्मिकाने तिला आणि तिच्या कुटुंबाला हैदराबादमधील घरी आमंत्रित केले. त्यांनी तिचे आदरातिथ्य केले आणि तिच्या निरागस इच्छेला प्रतिसाद दिला. या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, चाहत्यांनी त्यांच्या साधेपणाचे कौतुक केले आहे.