रश्मिका-विजयच्या लग्नानंतरच्या पहिल्या चित्रपटातील गाणं प्रदर्शित, अजय-अतुलने दिलंय संगीत
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा ही लोकप्रिय जोडी त्यांच्या आगामी चित्रपट 'राणाबल्ली'मुळे चर्चेत आहे. लग्नानंतर त्यांनी चित्रपटाचे पोस्टर आणि प्रोमो साँग 'एंधय्या सामी' प्रदर्शित केले आहे. हे गाणं अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केले आहे. चित्रपट १९व्या शतकातील सत्य घटनेवर आधारित असून विजय स्वातंत्र्यवीर राणाबल्ली आणि रश्मिका जयम्मा यांच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट ११ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.