रश्मिका मंदानाच्या सासरच्यांचं दाक्षिणात्य इंडस्ट्रीत आहे मोठं नाव, घ्या जाणून…
दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांनी २६ फेब्रुवारी रोजी पारंपरिक पद्धतीने लग्न केले. 'गीता गोविंदम' चित्रपटापासून डेटिंग करणाऱ्या या जोडीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विजयचे वडील गोवर्धन राव देवरकोंडा तेलुगू चित्रपट निर्माते आहेत, तर आई माधवी देवरकोंडा प्रोफेशनल ट्रेनर आहेत. विजयचा भाऊ आनंद देवरकोंडा देखील तेलुगू अभिनेता आहे. रश्मिका आता या फिल्मी कुटुंबाचा भाग झाली आहे.