वारकऱ्यांबरोबर रिंकू राजगुरूचा फुगडी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल, साधेपणाने वेधलं लक्ष
पंढरीची वारी हा अनेकांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. यंदा अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सिद्धेश लोकरे फुगडी खेळताना दिसले. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रिंकूने निळ्या रंगाचा पारंपरिक ड्रेस परिधान केला असून तिच्या साधेपणाचं कौतुक होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक सेलिब्रिटी आणि सामान्य माणसं वारीत सहभागी झाले आहेत.