रितेश देशमुखचं कौतुक पाहून भारावली पत्नी जिनिलीया, गोड व्हिडीओ पाहिलात का?
रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख ही जोडी बॉलीवूड आणि मराठी इंडस्ट्रीत लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या या जोडप्याचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत. 'फिल्मीग्यान' इन्स्टाग्राम पेजवर शेअर केलेला त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात रितेश चाहत्यांबरोबर फोटो काढताना दिसतो, तर जिनिलीया त्याचं कौतुक पाहून भारावली आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी कौतुकाच्या कमेंट्स केल्या आहेत. दरम्यान रितेश लवकरच 'राजा शिवाजी' चित्रपटात दिसणार आहे, तर जिनिलीया 'सितारे जमीन पर' चित्रपटात आमिर खानबरोबर झळकणार आहे.