“फक्त माझंच वय वाढतंय…”, जिनिलीयाच्या वाढदिवसानिमित्त रितेश देशमुखची मिश्कील पोस्ट
रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख हे मराठी व हिंदी इंडस्ट्रीतील लोकप्रिय कपल आहेत. जिनिलीयाच्या वाढदिवसानिमित्त रितेशने मिश्कील अंदाजात पोस्ट शेअर केली आहे. त्याने म्हटलं की, "माझं वय वाढत आहे पण तू तशीच आहेस, कारण तुला चांगला नवरा मिळाला आहे." रितेशने जिनिलीयाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत काही गोड फोटो शेअर केले. अलीकडेच ते 'राजा शिवाजी' चित्रपटात एकत्र झळकले होते.