‘राजा शिवाजी’निमित्त रितेश देशमुखने मानले रवी जाधव अन् नागराज मंजुळेंचे आभार; कारण काय?
रितेश देशमुख लिखित आणि दिग्दर्शित 'राजा शिवाजी' हा चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. रितेशने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. पूर्वी रवी जाधव आणि नंतर नागराज मंजुळे यांच्यासोबत हा चित्रपट करण्याचा विचार होता, पण ते शक्य झाले नाही. रितेशने या दोघांचे आभार मानले आहेत. चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर यांच्यासह अनेक कलाकार आहेत.