“कला ही स्वतंत्र ठेवली पाहिजे”, पाकिस्तानी कलाकारांवरील बंदीबाबत सई ताम्हणकरचं मत
२२ एप्रिल रोजी काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आली. यावर मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरने कलेला स्वतंत्र ठेवण्याबद्दल मत व्यक्त केलं आहे. तिने सांगितले की, कला ही एक वेगळी भाषा आहे आणि तिला कोणतेही अडथळे नसावेत. तसेच, तिने पाकिस्तानला स्पष्ट भाषा कळत नसल्याचे म्हटलं. भारतीय सैन्य आणि सरकारच्या कामगिरीचे कौतुक केले आणि युद्ध हे कशाचंही उत्तर नसल्याचे मतही व्यक्त केले.