समांथा रुथ प्रभूला दाक्षिणात्य इंडस्ट्रीत १५ वर्षे पूर्ण
दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हिला इंडस्ट्रीत १५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एका अवॉर्ड सोहळ्यात केक कापण्यात आला. समांथानं भावूक होत तेलुगू चित्रपटसृष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तिच्या या प्रवासात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या असून ती आता निर्मिती क्षेत्रातही सक्रिय आहे. समांथा लवकरच हिंदी चित्रपटांतूनही झळकणार आहे. सध्या ती दिग्दर्शक राज निदिमोरूसह रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत.