Video: समांथा रुथ प्रभूचं ठरलं? कथित बॉयफ्रेंडबरोबर घेतलं तिरुपती मंदिरात दर्शन
दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ( Samantha Ruth Prabhu ) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नागा चैतन्यबरोबर घटस्फोट झाल्यानंतर समांथाचं नाव आता लोकप्रिय दिग्दर्शकाबरोबर जोडलं जात आहे. काही दिवसांपूर्वी समांथा या लोकप्रिय दिग्दर्शकाबरोबर एका स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये, त्यानंतर एका पार्टीमध्ये दिसली होती. आता समांथा आणि या दिग्दर्शकाचा तिरुपती मंदिरातील व्हिडीओ समोर आला आहे. यामुळे समांथा दिग्दर्शकाला डेट करत असल्याच्या चर्चांना आणखी उधाण आलं आहे.