Still Alive! समय रैनाच्या शोने यूट्यूबवर रचला इतिहास, व्हिडीओने मोडला व्ह्यूजचा विक्रम
स्टँडअप कॉमेडियन समय रैनाने 'स्टिल अलाईव्ह' या शोद्वारे नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. यूट्यूबवर पोस्ट केलेल्या या शोला ५ कोटी ३४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, ज्यामुळे हा जगातील सर्वाधिक पाहिला गेलेला स्टँड-अप कॉमेडी स्पेशल ठरला आहे. 'इंडियाज गॉट लॅटेंट' शोमधील वादानंतर समयने या शोद्वारे त्याच्या संघर्षाचा प्रामाणिकपणे उल्लेख केला आहे.