“भारतात आता पूर्वीसारखी शांतता जाणवत नाही”; संजय दत्तने व्यक्त केली खंत
अभिनेता संजय दत्तने 'शेखर टुनाइट' या शेखर सुमन यांच्या कार्यक्रमात हजेरी लावली. त्याने आपल्या 'मुन्नाभाई' व्यक्तिरेखेच्या माध्यमातून देशातील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर मिश्कील भाष्य केले. संजय दत्तने देशातील सद्यस्थितीवर नाराजी व्यक्त करत, "मला आता भारतात पूर्वीसारखी शांतता जाणवत नाही," असे म्हटले. 'पाच मिनिटांसाठी पंतप्रधान झाल्यास काय कराल?' या प्रश्नावर त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यावर विनोद केला.